आमच्याकडून ‘चौकीदार’ होण्याची अपेक्षा ठेवू नका; साडेतीन लाख बँक अधिकाऱ्यांचे मोदींना पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच ट्विटरवरुन डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, बँक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र देशातील सरकारी बँक अधिकाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’ने या संघटनेने आमच्याकडून ‘चौकीदार’ होण्याची अपेक्षा ठेवू नका,अशा स्पष्ट शब्दात मोदींना पत्र लिहून नकार कळविला आहे.

‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’ने यासाठी संघटनेने थेट पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहिले आहे. आमचे महत्त्वाचे प्रश्न सोडवा. ते सुटेपर्यंत आमच्याकडून ‘मैं भी चौकीदार’ या राजकीय मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका, असा पवित्रा संघटनेने घेतला आहे. ‘बिझनेस स्टँडर्ड’ने या इंग्रजी दैनिकाने हे वृत्त दिले आहे. ‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’ने (एआयबीओसी) पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात सरकारी बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचला आहे. ‘सरकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मूळ समस्यांकडे लक्ष न देता तुम्ही आमच्याकडून ‘मैं भी चौकीदार’ या राजकीय प्रचारमोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा करु नका. सरकारी बँक कर्मचारी सरकारच्या धोरणांमुळे त्रासलेले आहेत,’ असे एआयबीओसींने मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, एआयबीओसी सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना आहे. जवळपास 3 लाख 20 हजार अधिकारी (एकूण अधिकाऱ्यांच्या 85 टक्के) या संघटनेचे सदस्य आहेत.

Add Comment

Protected Content