‘चुन चुन कर…’ – खासदार संजय राऊत यांचं एक ट्वीट व्हायरल

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | ईडीने कारवाई केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांचं एक ट्वीट सध्या सर्वत्र व्हायरल होतंय. यात ‘तुम मुझको कब तर रोकोगे’ असं विधान भाजप आणि ईडीला उद्देशून केलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

ईडीने कारवाई करत एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. संजय राऊतांनी केलेलं ‘your quote’ या अॅपवरील एक quote ट्वीट केलं आहे. त्यामध्ये संजय राऊत म्हणतात की,

 

“मैं सागर से भी गहरा हूँ,

तुम कितने कंकड फेंकोगे!

चुन चुन कर आगे बढूंगा मै,

तुम मुझको कब तर रोकोगे!!”

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपला आणि ईडीला आव्हान दिलं असल्याची चर्चा होत आहे.

Protected Content