महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची गैरसोय

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संपूर्ण राज्यासह पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून संपावर असल्याने कडक उन्हात ग्रामीण भागातून आपले विविध शासकीय कामे करून घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

अतिशय उन्हात येवून येण्या जाण्याचे प्रवास भाडे व वेळही वाया जात असल्याने राज्य सरकारने लवकरच तोडगा काढावा अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांकडून होत आहे. पाचोरा तहसिल कार्यालयातील १९ तर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील ९ कर्मचारी संपावर गेले आहेत.

राज्यासह पाचोरा येथील महसूल कर्मचारी ४ एप्रिल पासून संपावर उतरले असून त्यांनी कामबंद आंदोलन करुन तहसिलदार कार्यालयाच्या पायऱ्यांवर उभे राहून घोषणा बाजी देत जुनी पेन्शन योजना लागू करणे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, रिक्त पदे भरणे, संजय गांधी योजना, निवडणूक, रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री किसान योजना या कामासाठी स्वतंत्र पदे निर्माण करणे, अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नती देणे या विविध मागण्यासाठी बेमुदत संप सुरू झाला आहे.

संपात संघटनेचे तालुकाध्यक्ष वरद वाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब नेटके, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सुरेश साळुंखे, संपतराव पाटील, रेखा साळुंखे, कैलास श्रावणे, दिलीप गोसावी, गुलाब पाटील, तहसिल कार्यालयाचे प्रतिक्षा मनोरे, पुनम खैरनार, बाबासाहेब मगर, भरत पाटील, अमोल भोई, शेखर बोरुडे, भावना सुर्यवंशी, वैशाली भाबड, उमेश शिर्के, अभिजित येवले, उमेश पूरी, उमेश वाडेकर, रणजित पाटील, सूरेश पाटील, सिमा पाटील, प्रशांत पगार, संतोष कुंभार, कांतीलाल तेली, गणेश चौधरी, रविंद्र बोरसे, अशोक माळी यांनी सहभाग घेतला आहे.

Protected Content