पेपर देऊन येताना विद्यार्थ्यांचा अपघात – एकजण जागीच ठार; दोन जखमी

पहुर, ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाकोदकडे सिंहगड हॉटेलजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलेट गाडी रोडच्या कडेला जाऊन पडल्याने गाडी चालवत असलेला तरुण जागीच ठार झाला तर मागे बसलेले दोन जण जखमी झाले आहेत

गाडी चालवत असलेला व्यंकटेश सुधाकर सपकाळे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला तर मागे बसलेले दोन जण जखमी झाले असून त्यांना हाता पायाला ईजा झाल्याने पुढील उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ‘जळगाव येथुन गोसेगाव ता.सिल्लोड,जि. औरंगाबाद येथे बारावीचा पेपर देण्यासाठी गेलेले जळगाव शिवाजी नगर येथील व्यंकटेश सुधाकर सपकाळे,  करण भगत, धिरज सिरसाठ हे तिघेजण पेपर देऊन बुलेट या दुचाकीवर (क्र.एम एच १९ डीपी ७७९९) जळगावकडे परत येत होते. वाकोदकडे  सिंहगड हॉटेलजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्याने गाडी चालक विक्की उर्फ़ व्यंकटेश सुधाकर सपकाळे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेले करण व धिरज यांना हातापायाला मार लागल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

झालेली घटना लक्षात येताच सिंहगड हॉटेलचे मालक विशाल जोशी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना प्रथमोपचारसाठी वाकोद ग्रामीण रुग्णालयात पाठवले. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पो.का.ईश्वर देशमुख, विनय सानप यांनी घटनास्थळी धाव घेत मयताच्या नातेवाईकांना झालेल्या घटनेची माहिती दिली. मयतास पहूर ग्रामीण रूग्णालयात आणले असून सकाळी शवविच्छेदन केले जाणार आहे.

Protected Content