बुलडाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा अधिवेशनमध्ये आज खासदार प्रतापरावजी जाधव यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील जलबं रेल्वे स्टेशन येथे कोविड महामारीमुळे रेल्वे गाड्या थांबा बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तरी आता महाराष्ट्रा मध्ये कोविड महामारीचे प्रमाण कमी झाल्यामुळे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील जंलब रेल्वे स्टेशन येथे रेल्वे गाड्या थांबा सुरू करण्यात यावा. अशी मागणी लोकसभा अधिवेशनातील शून्य प्रहरात केली.