Home धर्म-समाज महेश पवार एल.एल.बी. परिक्षा विशेष प्राविण्यातून उत्तीर्ण

महेश पवार एल.एल.बी. परिक्षा विशेष प्राविण्यातून उत्तीर्ण

0
51


पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील श्री.शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी महेश पवार यांचा एल.एल.बी.परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रो.डॉ.वासुदेव वले, उपप्राचार्य प्रो.डॉ.जे.व्ही.पाटील, प्रा.स्वप्नील भोसले, नितीन पाटील, विजय सोनजे, एन. टी. पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

महेश पवार यांनी आपला व्यवसाय पूर्ण वेळ सांभाळून वयाच्या ४८ व्या वर्षी हे यश इच्छाशक्ती व आत्मविश्वास प्रबळ असल्याचे द्योतक असल्याचे दाखवून दिले आहे. पाचोरा शहरात गेल्या २३ वर्षापासून व्यावसायिकता जोपासत सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवत आपली मेहनत आणि सचोटीवर विश्वास ठेवून कोणतेही कार्य सतत प्रयत्नपूर्वक करत राहिल्याने यश हे मिळतेच हेच त्यांच्या यशाचे गमक आहे असे ते म्हणतात. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


Protected Content

Play sound