किनगाव इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुलमध्ये ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन विद्यार्थ्यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मदर तेरेसा यांच्या स्मृतींदिनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला सचिव मनिष पाटील, व्यवस्थापक पूनम पाटील, प्राचार्य अशोक पाटील व उपप्राचार्य राजश्री अहिरराव यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण व मदर तेरेसा यांचा प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.

शिक्षक दिनानिमीत्त सचिव मनिष पाटील व पूनम पाटील यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात शिक्षकाची महती सांगितली व शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थींनी शिक्षक बनून वेगवेगळ्या शिक्षकांची भूमिका साकारली यात इ.८ वी ते इ.१० च्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य केले.

यावेळी शाळेचे शिक्षक हर्षल मोरे, योगीता बिहारी, देव्यानी सोळुंके, मिलींद भालेराव, भावना चोपडे, प्रतिभा धनगर, गोपाळ चित्ते, अनिल बारेला, पवनकुमार महाजन, संपत पावरा, वैशाली धांडे, शाहरूख खान, सुहास भालेराव, प्रतिक तायडे, पुजा शिरोडे, तुषार धांडे, नूतन देशमुख, अनिता देशमुख, रामेश्वरी कांबळे, बाळासाहेब पाटील आदींची उपस्थीती होती.

Protected Content