Home धर्म-समाज मुर्शिद शाह नक्षबंदी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कव्वलीचे आयोजन

मुर्शिद शाह नक्षबंदी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कव्वलीचे आयोजन

0
36

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हरीपुरा गावात हजरत मस्तान शाह बाबा यांचा लाखो हिन्दू मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेली प्रसिद्ध दर्गाह आहे. या ठिकाणी हजरत हसन मुर्शिद शाह नक्षबंदी यांच्या पुण्यतिथी सोहळा निमीत्त सालाबाद प्रमाणे महाप्रसाद ( लंगर) व मैफीले कव्वालीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

२७ सप्टेंबर २०२२ मंगळवार रोजी संदल शरीफ व २८ सप्टेंबर बुधवार रोजी प्रसाद ( लंगर ) चा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. २८ सप्टेंबर रोजी संध्यकाळी कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुंबई येथील प्रसिद्ध कव्वाल अजिम नाजा व जळगाव येथील हाजी लतिफ हैरा यांचा कव्यालीचा जंगी मुकाबला रंगणार आहे. तरी परिसरातील हिंदू मुस्लिम भाविकांनी उर्सला येऊन महाप्रसाद घेऊन कव्वालीचा आनंद घ्यावा, असे आवाहन दर्गाचे ट्रस्ट कासम बाबा, गुलशेर तडवी, सुलेमान तडवी, भुरा तडवी, छबू तडवी, मासूम तडवी, लतिफ तडवी, उपसरपंच जहांगीर तडवी, फिरोज तडवी, हुसेन तडवी यांनी केले आहे . या ठिकाणी उर्स निमित्ताने हरिपूरा, मोहराळा, कोरपावली, दहिगाव ,सौखेडा सिम, परसाडे जळगाव जिल्ह्यातील व मध्यप्रदेश राज्यातुन मस्तानशाह बाबांच्या दर्शनासाठी हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या संख्येत येतात, या कार्यक्रमा सहभागी होऊन आलेल्या भाविकांना सहकार्य करावे असे आवाहन हिन्दू मुस्लिम पच कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound