श्री जनार्दन हरीजी महाराजांनी घडविला इतिहास !

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज फैजपूर, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ चारधाम यात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये ८०० भाविक, २८ बस, ३ इनोव्हा गाडी, २ पिकअप व्हॅन एवढा मोठा ताफा घेऊन चारधामला जाणे हा इतिहास बनला आहे.

गंगामैय्या यांच्या कृपेने आणि गुरूंच्या आशीर्वादाने संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला. एकाच वेळेस आठशे भाविकांना चारधामची यात्रा करणे, सर्वांची राहण्याची, प्रवासाची तसेच भोजनाची व्यवस्था करणे सोपे नव्हते परंतु श्री जनार्दन हरीजी महाराजांनी आपल्या सेवकांसह हा प्रवास यशस्वी केला. श्री जनार्दन हरीजींनी ८०० भाविकांना चारधामचे दर्शन घडवून नवा विक्रम केला आहे. दरवर्षी पितृ पक्षात हजारो भाविकांना वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर जाऊन यात्रा करतात. जे गरीब आहेत ते जास्त खर्च करू शकत नाहीत अशांचीही ते व्यवस्था करतात.

चारधाम यात्रा सुरू करण्यापूर्वी जयराम आश्रम हरिद्वार या दे भूमीत १० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२२ या तीन दिवसात सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये प. पू. जगद्गुरू सतपंथाचार्य श्री ज्ञानेश्वरदासजी महाराज प्रेरणापीठ पिराणा, निर्मल पीठाधीश्‍वर स्वामी श्री ज्ञानदेवसिंहजी महाराज, जयराम आश्रमाचे महंत श्री ब्रह्मचारी ब्रह्मस्वरूपजी, महामंडलेश्वर मनमोहनदासजी, महायत्री प.पू. जितेंद्रनंदजी, वि. हिं. प. चे श्री अशोक तिवारी जी, महंत अरुणदासजी, महंत गुरुमालसिंहजी यांचे दर्शन व आशीर्वचनाचा लाभ मिळाला.

१३ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत कोणत्याही अडचणीशिवाय सर्व भाविक चारधामची यात्रा पूर्ण करून आपापल्या घरी सुखरूप पोहोचले असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त करून भगवंताला, गुरूंना धन्यवाद दिले.

Protected Content