Home धर्म-समाज पाचोऱ्यात २६/११ हल्ल्यातील विरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली

पाचोऱ्यात २६/११ हल्ल्यातील विरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली

0
33

पाचोरा प्रतिनिधी । मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि निष्पाप लोकांना आज पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

याप्रसंगी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया वसावे, पी. टी. सी. चेअरमन संजय वाघ, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेनेचे युवानेते सुमित किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहर खान, सतिष चौधरी सह स्वातंत्र्य सैनिकांनी कॅण्डल लावुन भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.

या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाप्रसंगी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजहर खान व पी. टी. सी. चेअरमन संजय वाघ यांनी शहीद झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी व निष्पाप जनतेच्या कार्याला सलाम करत झालेल्या भ्याड हल्ल्याचा थरारक प्रसंग सांगितला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पोलिस बॉईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, मंगलसिंग राजपुत, जिल्हा मार्गदर्शक डॉ. अतुल पाटील, जिल्हा सचिव प्रफुल पाटील, विधिविषयक सल्लागार उमेश राठोड, तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख, उपतालुका अध्यक्ष करण पाटील, कार्याध्यक्ष बंटी पाटील, संपर्क प्रमुख मोईन शकील शेख, तालुका विधीविषयक सल्लागार अॅड. प्रशांत भावसार, प्रसिद्धी प्रमुख बंडु सोनार, तालुका सचिव गौरव चौधरी, हर्षल पाटील यांनी परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound