राज्यातील लोक मुख्यमंत्र्यांच्या कामावर असमाधानी- मनसेच्या सर्वेक्षणातील चित्र

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ६३ टक्के लोकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामावर नाराजी व्यक्त केल्याचे आज पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे. तर जनतेला आता अनलॉक हवा असल्याचेही यातून अधोरेखीत करण्यात आले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर सर्वेक्षण घेतले होते. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे.

समाजमाध्यमांवरुन विविध मुद्द्यांवर सात दिवसात नागरिकांचा कौल जाणून घेतला. ५४ हजार १७७ नागरिकांनी या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्‍नांवर आपली मते नोंदवली व लॉकडाउन संपुष्टात आणण्याच्या बाजूने कौल दिला. महत्वाची बाब म्हणजे तब्बल ६३ टक्के नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त केले.

१. लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का?

होय ७०.३ टक्के
नाही २६ टक्के
माहिती नाही ३.७ टक्के

२. लॉकडाऊनचा तुमच्या नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे का?

होय ८९.८ टक्के
नाही ८.७ टक्के
माहिती नाही १.५ टक्के

३. लॉकडाऊनच्या काळात आपल्या बुडालेल्या नोकरी/उद्योगधंद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली आहे का?

होय ८.७ टक्के
नाही ८४.९ टक्के
माहिती नाही ६.४ टक्के

४. राज्य सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का?

होय ३२.७ टक्के
नाही ५२.४ टक्के
माहिती नाही १४.९ टक्के

५. शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत आहे का?

होय १०.३ टक्के
नाही ७४.३ टक्के
माहिती नाही १५.४ टक्के

६. लोकल रेल्वेसेवा आणि एसटी सेवा पूर्ववत सुरु झाली पाहिजे का?

होय ७६.५ टक्के
नाही १९.४ टक्के
माहिती नाही ४.१ टक्के

७. लॉकडाऊनच्या काळातील वीज देयकाबद्दल आपण समाधानी आहात का?

होय ८.३ टक्के
नाही ९०.२ टक्के
माहिती नाही १.५ टक्के

८. लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत आणि योग्य मिळाली आहे का?

होय २५.९ टक्के
नाही ६०.७ टक्के
माहिती नाही १३.४ टक्के

९. या संपूर्ण काळात मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का?

होय २८.४ टक्के
नाही ६३.६ टक्के
माहिती नाही ८ टक्के

Protected Content