मिलिंद नार्वेकर, एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांची नावे विधानपरिषदेसाठी चर्चेत

मुंबई : वृत्तसंस्था । विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ जागांची यादी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांनी प्रत्येकी चार उमेदवार द्यायचे निश्चित केले असून, त्यानुसार नावे देण्यात येणार आहेत.

शिवसेनेमध्ये सुनील शिंदे, सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, नितीन बानगुडे पाटील, अर्जुन खोतकर या नावांची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे, उत्तमराव जानकर, राजू शेट्टी यांना संधी मिळू शकते असे बोलले जाते. काँग्रेसकडून नसीम खान, सचिन सावंत, मोहन जोशी, रजनी पाटील, मुजफ्फर हुसेन यांची नावे पुढे येऊ शकतात.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी पाठवण्यात आलेल्या यादीच्या बाबतीत तांत्रिक मुद्दे उपस्थित केल्याने राज्यपालनियुक्त सदस्यांचे भिजत पडलेले घोंगडे अद्यापही तसेच होते. त्यानंतर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यावर निर्णय घेतला जात नव्हता. शिवाय शिवसेनेला पाच जागा हव्या असल्याने त्यावरून घोडे अडले होते. मात्र नंतर काँग्रेसने सर्वांना समान जागा देण्याचा आग्रह धरल्याने अखेर त्यावर एकमत झाले आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात या नावांची यादी येणार होती. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि राज्यपालांत वाद निर्माण झाल्याने पुन्हा ही यादी रखडली होती. मात्र आता मंत्रिडळाच्या कार्यक्रम पत्रिकेत या यादीला जागा मिळाली असल्याचे समजते.

 

Protected Content