अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा भादली-तरसोद येथे प्रचार दौरा

WhatsApp Image 2019 10 10 at 12.49.23 PM

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी आज गुरुवार (दि. १० ) रोजी  भादली व तरसोद येथे प्रचार दौरा केला. यावेळी गावातील महिलांनी चंद्रशेखर अत्तरदे व माधुरी अत्तरदे यांचे औक्षण करून तसेच फुलहार घालून स्वागत केले. व चंद्रशेखर अत्तरदे यांच्या विजयासाठी गावकऱ्यांनी देवाकडे साकडे घातले.

अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचार दौऱ्या प्रसंगी त्यांच्या सोबत प्रकाश बारी, सुदाम राजपूत, अरुण सपकाळे, मिलिंद चौधरी, अरुण बर्हाटे, ईश्वर मराठे, मनोज इंगळे, दीपक ढाके, नकुल चौधरी, दिगंबर खाचणे, सुनिल अत्तरदे उपस्थित होते. तसेच धरणगाव तालुक्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी तसेच भादली गावचे सरपंच, ग्रा. प. सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरणगाव शहरातील नगरसेवक कैलास माळी, ललित येवले, शिरीष बायस, यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. या दौऱ्याप्रसंगी ज्यूनिअर मकरंद अनासपुरे, भाजपा ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष संजय महाजन , भाजपा शहर अध्यक्ष सुनिल वाणी, भाजपा तालुका सरचिटणीस सुनिल चौधरी , धरणगाव येथील नगरसेवक गुलाब मराठे, ललित येवले, कैलास माळी, सचिन पाटील, कांतीलाल माळी, भालचंद्र माळी, शरद आन्ना, राजेंद्र येवले, शिरीष आन्ना, शेखर पाटील, कन्हैय्या रायपूरकर, सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा राकेश नन्नवरे , सोनवद, सरपंच निर्दोष पाटील यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content