दीपाली सैयद म्हणतात, ”उध्दव ठाकरेंनीच शिंदे गटात प्रवेश करावा !”

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अभिनेत्री दीपाली सैयद यांनी आता थेट उध्दव ठाकरे यांनीच शिंदे गटात प्रवेश घ्यावा असा सल्ला दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वाटेवर असणार्‍या दीपाली सैयद यांनी आज एक अजब वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज त्यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना सांगितल की, माझा शिंदे यांच्या पक्षात प्रवेश होणार होता मात्र काही अडचणींमुळं तो होवू शकला नाही, माझ्या प्रवेशाला कोणाचाही विरोध नाही. ठाकरे गटात मला पाहिजे तशी साथ मिळाली नाही, माझी इच्छा आहे की, माझ्या सोबत उद्धव ठाकरेंनी देखील शिंदे गटात प्रवेश करावा, ज्या वेळी माझा प्रवेश शिंदे गटात होईल त्यावेळी उद्धव ठाकरे त्या स्टेजवर असतील ! असे त्या म्हणाल्या. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, दीपाली सैयद यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपकडून अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दीपाली सय्यद यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा तीव्र विरोध केला होता. यानंतर मात्र आता त्या लवकरच शिंदे गटात दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: