कासोदा येथील होली इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

wp 15805525504283386977505345344923

एरंडोल प्रतिनिधी | तालुक्यातील कसोदा येथील होली इंग्लिश मिडीयम स्कूलचे नुकतेच वार्षिक स्नेह – संमेलन जल्लोषात संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती देवीच्या प्रतिमेस माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास एरंडोल तालुक्याचे शिक्षणाधिकारी विश्वास एच. पाटील, कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव, रवींद्र डी. महाजन शिक्षणाधिकारी अमळनेर व जे. डी.पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एरंडोल. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मंत्री सचिव नीरज मंत्री, उपाध्यक्षा पायल मंत्री, संचालिका उज्वला मंत्री, अंजली मंत्री , पी.एस.पाटील आदि उपस्थित होते.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, कोळी गीत, शेतकरी आत्महत्या नाटक शिवाजी महाराज यांचे गीत अफजल खान वध पोवाडा, मराठी अस्मिता जपणारी लावणी, फनी डान्स तसेच विविध लोक गीतावर नृत्याविष्कार सादर केलेत.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यपक राजेंद्र माळी यांच्या अध्यक्षतेखाली व राहुल महानुभाव, सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख यांच्या सोबत सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी राहुल पाटील, राहुल धनगर, कु. माधुरी ढोले,रुपाली चौधरी मॅडम, वैशाली सोनवणे, शकीला कुरेशी, अनिता गढरी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Protected Content