Home Cities एरंडोल मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांची शिक्षक सेना एरंडोल तालुकाध्यक्षपदी निवड

मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांची शिक्षक सेना एरंडोल तालुकाध्यक्षपदी निवड

0
4

एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खडकेसिम येथील महेंद्रसिंह धर्मसिंह पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांची शिक्षक सेनेच्या एरंडोल तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजेंद्र पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिक्षक सेनेने त्यांच्यावर एरंडोल तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, संघटनेचे कार्य अधिक बळकट करणे आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सक्रिय भूमिका बजावण्याची अपेक्षा त्यांच्या नियुक्तीनिमित्त व्यक्त करण्यात येत आहे.

या नियुक्तीप्रसंगी शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष तथा नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते राजेंद्र पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा माध्यमिक विभागाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्य समन्वयक संभाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस महेंद्र पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हा समन्वयक जगदीश पाटील, माजी सरपंच रविंद्र जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिक्षक सेनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कार्य करू, असा विश्वास राजेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.  राजेंद्र पाटील यांच्या नियुक्तीमुळे एरंडोल तालुक्यात शिक्षक सेनेचे संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून त्यांच्या निवडीचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे.

 


Protected Content

Play sound