प्रगती करायची असेल तर परिवर्तन स्वीकारले पाहिजे- पल्लवी जाधव

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर परिवर्तन स्वीकारायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन बेंडाळे महाविद्यालयात  महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी पल्लवी जाधव हिने “ युवतींना मनोरंजन क्षेत्रातील संधी, या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानात केले.

पल्लवीने बॉलीवूड चित्रपट सृष्टीच्या रुपेरी पडद्यावर आपली छटा उमटवत गंगुबाई काठीयावादी आणि मर्दानी या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केलेली आहे. विद्यार्थिनींसोबतच्या आपल्या संवादात पल्लवीने बेंडाळे महिला महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग ते नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा सह नाट्य व चित्रपट क्षेत्रातील तिचा प्रवास उलगडला. तुम्हाला आपल्या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर तर त्या क्षेत्रात होणारे परिवर्तन स्वीकारा असा यशोमंत्र पल्लवी जाधव यांनी उपस्थितांना दिला. गंगुबाई काठीयावाडी, मर्दानी व नाट्य क्षेत्रातील जडण घडण पल्लवी ने मांडली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ गौरी राणे यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या फिल्म मेकिंग अँड ड्रामाटिक्स विभागासह विविध कौशल्य विभागांची माहिती विद्यार्थिनींना देत पल्लवी सारखे उत्तम कलाकार व्हायचे असेल तर महाविद्यालय विद्यार्थिनींना नक्कीच प्रोत्साहन व मदत करेल असे सांगितले. सदर कार्यक्रमास २०० च्या वर विद्यार्थीनिनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला .सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचर्या डॉ.गौरी राणे ,माजी विद्यार्थिनी समितीच्या अध्यक्षा डॉ.मनीषा पाटील आणि इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सायली पाटील यांनी मानले.

 

 

Protected Content