सचिन गुलदगड यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संजिवनी फाऊंडेशन, महाराष्ट्रच्या वतीने श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांना संगमनेर मालपाणी हेल्थ क्लब येथे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सचिन गुलदगड यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला पुरस्कारामध्ये सचिन गुलदगड यांना मानपत्र,शाल आदिंच्या स्वरुपात हा पुरस्कार देण्यात आला.

लोकनेते सचिन गुलदगड यांनी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून युवा वर्गाला, कार्यकर्त्याना बळ देत गाव तेथे शाखा उभी करून त्याद्वारे रक्तदान शिबीर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, स्वच्छता अभियान, शाळा, ग्रंथालयांना ग्रंथ-पुस्तकांचे वाटप, वकृत्व स्पर्धा आदी उपक्रम राबविले. वृक्ष क्रांती अभियान सुरु करून राज्यातील बहुसंख्य गावे दत्तक घेऊन वृक्ष चळवळ सुरु केली. लेक वाचवा- देश वाचवा हाक देत समाजात जनजागृती केलीआहे. कार्यक्रमप्रसंगी संजिवनी फाऊंडेशनचे चेअरमन ज्ञानेश्वर सानप, सुजित गायकवाड, राहुल शिंदे, पंकज माताडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Protected Content