जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीची ११ मार्च पर्यंत विशेष मोहिम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगांव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव अंतर्गत दि.२३ फेबुवारी, २०२४ ते ११ मार्च, २०२४ या कालावधीत आदयक्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानांअतर्गत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमचे आयोजन करण्यात येणार आहे. इयत्ता वर्ग १२ वी विज्ञान शाखेतील अर्ज सादर केलेल्या सर्व विदयार्थ्यांचे अर्ज पडताळणीचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच ३१ जानेवारी २०२३ अखेर व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेशीत विदयार्थी, सेवा, निवडणुक, या प्रयोजनाच्या अर्जाना ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेली आहे. अशा अर्जदारांना जाहीर आवाहन करण्यात येते की, ०५ व ७ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदीर समोर महाबळ जळगांव येथे त्रुटी पुर्तता शिबीर आयोजित करण्यात आले असून, सदर कालावधीत मागासवर्गीय विदयार्थ्यांनी उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या अर्जाबाबत त्रुटीची पूर्तता करण्यात यावी. जेणे करुन विदयाथ्यांचे अर्ज त्रुटी पुर्तता करुन निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येईल.

शैक्षणीक वर्ष २०२४ मध्ये ज्या मागासवर्गीय विदयाथ्यांनी सीईटी सेल अंतर्गत अर्ज भरले आहे अशा विदयार्थ्यांनी तात्काळ त्यांचे अर्ज या कार्यालयात जमा करण्यात यावे. जेणेकरुन सदर कालावधीत विदयार्थी तसेच सेवा व निवडणूक अर्जदारास ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. असे अवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव यांनी केले आहे.

Protected Content