गोलाणी मार्केटमधून दुचाकीची चोरी; पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । गोलाणी मार्केटमधून फळविक्रेत्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. शहर पोलीस ठाण्यात दुचाकी लंपास करणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, इलियास साहेबजी बागवान (वय-४२) रा. ताज पान सेंटर शाहु नगर यांचे गोलाणी मार्केटमध्ये फळविक्रीचे दुकान आहे. घर ते दुकानावर जाण्यासाठी (एमएम १९ डीसी ६७६९) क्रमांकाचे दुचाकीचा वापर करतात. सोमवारी सकाळी ८ वाजता गोलाणी मार्केटमध्ये आले. त्यांनी मार्केटमधील धनश्री ईलेक्ट्रिक दुकानासमोर दुचाकी पार्कींगला लावली. दरम्यान, ८.३० वाजता कामाच्या निमित्ताने ते दुचाकीजवळ आले असता दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी गोलाणी मार्केट पिंजून काढूनही मिळून आली नाही. २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी इलियास बागवान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.

Protected Content