लाचखोर विद्यूत निरीक्षकाला तीन दिवसांची पोलीस कस्टडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय कंत्राटदाराचे लायसन्स नूतनीकरणासाठी १५ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या विद्यूत निरीक्षकाला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी कार्यालयातच रंगेहात अटक केली होती. बुधवारी २८ फेब्रुवारी दुपारी जळगाव जिल्हा न्यायालयातील न्या. जे.जे. मोहिते यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवाशी आहे. ते शासनाचे इलेक्ट्रीक कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. त्याच्याकडे ईलेक्ट्रीक काम करण्याचे लायसन्स आहे. या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी जळगाव उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे विद्यूत निरीक्षक गणेश नागो सुरळकर (वय-५२ रा. पार्वती नगर, जळगाव) यांनी तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच स्विकारतांना जळगावच्या लाचलुचपत विभागाने पंचांसमक्ष १५ लाच स्वीकारतांना अटक केली होती. याप्रकराी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी सुरळकर यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती जे.जे. मोहिते यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकीत सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

Protected Content