पंकजा मुंडे, गिरिश महाजन यांची लोकसभा निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भाजपने आपल्या २३ लोकसभा निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. उत्तर मुंबई क्षेत्रासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या या यादीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

२९ फेब्रुवारी रोजी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर देशातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी 100 उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी या निरीक्षकांना जबाबदारी देण्यात आलेल्या मतदार संघातून विद्यमान खासदार आणि त्याला पर्यायी दोन उमेदवारांची नावे द्यायची आहेत. या माध्यमातूनच लोकसभा निवडणुकीत तिकिटांचे वाटप होणार आहे. त्यामुळे आता आधी चर्चा सुरु होती, त्या प्रमाणे पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि वनमंत्री सुधीर मुनत मुगंटीवार हे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार नसतील, हे जवळपास निश्चित झाले आहे.

Protected Content