एकनाथ शिंदे मुंबईत दाखल : फडणविसांसोबत राज्यपालांची घेणार भेट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे मुंबईला पोहचले असून ते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा दाखल करणार आहेत.

काल रात्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गटनेता म्हणून निवड करण्यात आली. आजच्या बैठकीत शिवसेनेचा गटनेता म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. सर्व ५० आमदारांनी मला अधिकार दिले आहेत आणि अधिकृत केलं आहे. पुढची रणनीती मुंबईत गेल्यानंतर ठरवून कळवली जाईल. नंतर मी पुन्हा गोव्याला जाणार आहे. सध्या दोन प्रस्ताव दिले आहेत. त्यानुसार मी तिकडे जात आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

या अनुषंगाने एकनाथ शिंदे हे दुपारी सव्वादोनच्या सुमारास मुंबईला पोहचले. ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी त्यांची भेट घेणार असून नंतर हे दोन्ही मान्यवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा दाखल करणार आहेत. शिंदे यांच्या मुंबईतील आगमनाप्रसंगी काहीही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून कडेकोटे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

Protected Content