केंद्रीय कृषिमंत्र्यांची जिल्ह्यातील परिस्थितीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा

 

जळगाव, प्रतिनिधी । केंद्रीय कृषि तथा शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, सामाजिक न्यायमंत्री थेवरचंद गेहलोत तसेच खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आदी मान्यवरांचे शहापूर बऱ्हाणपूरसाठी जाण्यासाठी जळगाव विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी जिल्ह्यातील शासकीय कामांचा व राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.  

आज बुधवार दि. ३ मार्च रोजी केंद्रीय कृषि तथा शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, सामाजिक न्यायमंत्री थेवरचंद गेहलोत तसेच खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचे जळगाव विमानतळावर खा. रक्षा खडसे, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, उपमहापौर सुनील खडके, महापालिका स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजप महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी आदींनी भेट घेतली. या भेटीत केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी जिल्ह्यात किती मतदार संघ आहेत. कोणत्या पक्षाचे किती खासदार, आमदार आहेत. शासकीय व पक्षाच्या कामाबाबत तसेच राजकीय बलाबल कसे आहे ? याबाबत सविस्तर चर्चा केली.  

 

Protected Content