आय.एम. आर. येथे तीन दिवसीय इथिकल हॅकिंग मार्गदर्शन शिबीर

DSC 0087 Copy 1

जळगाव, प्रतिनिधी | येथिल के. सी. इ. सोसायटीचे इन्स्टिट्युट ऑफ़ मॅनेजमेंट ऍन्ड रीसर्च येथे, इथिकल हॅकिंग या विषयावर गोविंद रे ह्यांचे तीन दिवसीय मार्गदर्शनपर शिबीराचे उद्घाटन सकाळी इन्स्टिट्युटच्या सेमिनार हॉलमध्ये झाले. उद्घाटन प्रसंगी आय.एम. आर.च्या संचालिका प्रो. डॉ. शिल्पा बेड़ाळे आणि संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. तनुजा फेगडे व्यासपीठावर हजर होते.

 

या शिबिरात के‌. सी. ई. इंजिनिअरिंग, जी. डी. बेंडाळे महाविद्यालय, मु. जे. महविद्यालय तसेच पुणे येथिल असे एकुण ४५ विद्यार्थी उपस्थित आहेत. उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी विषयी मह्त्वपुर्ण मार्गदर्शन देण्यात येणार आहे. ऑनलाइन गुन्ह्यांनपासुन स्वतःचे संरक्षण कसे करावे, तसेच इथिकल हॅकिंगच्या माध्यमातुन सायबर गुन्हे कसे शोधता येतात, एखाद्या सायबर सेक्युरिटीत असणारे दोष कसे शोधून काढावे हे प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यात येणार आहे. या शिबिराचे मार्गदर्शक गोविंद रे हे फ़्रिटीन इन्फ़ो सोल्युशन या कंपनीचे फाऊड़र असुन ते स्वतः ठाणे रुलर पोलिस स्टेशनमध्ये विविध सायबर गुन्ह्या सम्बधित केसेस सोडवतात. या वर्कशॉप दरम्यान इथिकल हॅकिंगचे महत्त्व अतिशय वाढणार असुन आगामी काळात याक्षेत्रात नवनविन व्यवसायिक व नौकरिच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे गोविंद यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. संचालिका प्रो. डॉ. शिल्पा बेड़ाळे यांनी हजर विद्यार्थ्यानी या तीन दिवसात लक्षपुर्वक सर्व या उपक्रमात सहभाग घ्यावा आणि प्रात्यक्षिकामधुन इथिकल हॅकिंग संदर्भात अधिका अधिक ज्ञान मिळवावे असे या प्रसंगी सांगितले. यापुढे ही हा उपक्रम आय. एम. आर. राबविणार असुन यातील अद्ययावत माहिती व मार्गदर्शन विद्यार्थ्याना यामुळे उपलब्ध होईल असे प्रा. तनुज फेगडे यांनी उपस्थित विद्यार्थ्याना सांगितले. यशस्वितेसाठी फ़्रिटीन इन्फ़ो सोल्युशन या कंपनीचे मुरारी ठाकुर तसेच इन्टीग्रेटेड एम. सी. ए. वर्गाच्या शशिकांत सोनगीरकर, गौरव पाटिल यांनी सहकार्य केले. उद्घाटन समारंभाचे सुत्रसंचालन इन्टीग्रेटेड एम. सी. ए. वर्गाच्या आष्लेशा जगताप या विद्यार्थीनिने केले.

Protected Content