मालकावर चाकूहल्ला करणाऱ्या मजूराला सक्तमजुरीची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मजूरीचे पैसे घेण्याच्या कारणावरून दुकान मालकावर चाकूहल्ला केल्या प्रकरणी आरोपी दिपक मधुकर दुसाने रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव याला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती डी.एन. खडसे यांनी दोन वर्ष सक्तमजूरीची आणि २ हजाराचा दंड अशी शिक्षा शनिवारी १ जुलै रोजी दुपारी २ वाजता सुनावली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावातील वाघ नगर परिसरात सागर शंकर भामरे यांचे वाघ नगर स्टॉप येथे साईदर्शन फेब्रीकेशन वेल्डींग दुकान आहे. या दुकानावर आरोपी दिपक दुसाने हा कामाला होता. त्यानंतर त्याने काम सोडले होते. २५ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ९ वाजता दिपक दुसाने हा दुकानावर आला. त्याने सागर भामरे यांना कामचे राहिलेले पैसे मागितले. त्यावर सागर यांनी दुपारी १२ वाजता पैसे घेवून जा असे सांगितले. याचा राग आल्याने दिपक दुसाने याने हातातील चाकूने वार करून सागर भामरे यांना जखमी केले. त्यानंतर पसार झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधिश डी.एन.खडसे यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकुण ८ साक्षिदारांचा साक्ष घेण्यात आली.  या खटल्यात सागर भामरे, दुकानात काम करणारे कारागीर आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यानुसार न्यायमुर्ती यांनी दिपक दुसाने याला दोषी ठरवत वेगवेगळ्या कलमान्वये दोन वर्ष सक्तमूजरी आणि २ हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. निलेश चौधरी करीत आहे.

Protected Content