किरणादुकानदाराचे बंद घर फोडले; ७२ हजाराचा मुद्देमाल लांबविला

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील कोणार्क सोनाई नगरातील किरणा दुकानदाराचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे चांदीचे व रोकड असा मुद्देमाल चोरून येण्याचे समोर आले आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कृष्णा महादू जाधव (वय-52) रा. तेजस कोणार्क सोनई नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कृष्णा जाधव यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी करीत आहे.

Protected Content