कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांना तातडीने तात्काळ साक्षीसाठी बोलवा

sharad pawar new 696x447

 

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरेगाव भीमा प्रकरणी यासंदर्भात तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी चौकशी आयोगाकडे एका अर्जाद्वारे केली आहे.

 

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाचा आणि त्यात पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. दोन दिवसापूर्वीच पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावं घेतली होती. “कोरेगाव भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोकं स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. इथले स्थानिक ग्रामस्थ इथे येणार्‍या लोकांना पाण्याची व्यवस्था करतात. स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्यांमध्ये कोणतीही कटुता नव्हती. मात्र, आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी फिरुन वेगळे वातावरण निर्माण केले, असा आरोप पवार यांनी केला होता. त्यावरून पवारांना या दंगलीबद्दलची ही माहिती कोठून मिळाली. त्यांच्याकडे आणखी काय माहिती आहे? याबद्दल त्यांची तातडीने साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी केली आहे. यावर आयोग काय निर्णय घेतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Protected Content