शिरसोलीत तरूणावर प्राणघातक हल्ला; कारण आहे किरकोळ …

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चारचाकी वाहनासाठी दिलेले कॅरी परत मागितल्याचा राग आल्याने दोन जणांनी शिवदास उत्तम बारी (वय-३४, रा. शिरसोली, ता.जि.जळगाव) या तरूणाला मारहाण केली. यात एकाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याने बारी यांचा हात फॅक्चर झाल्याची घटना शिरसोली गावातील इंदीरा नगरात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील इंदीरा नगरात शिवदास बारी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शिवदास बारी यांनी त्यांच्या चारचाकी वाहनाची कॅरी गावात राहणारे भरत भानुदास बारी यांना वापरण्यासाठी दिली होती. ती कॅरी शिवदास बारी यांनी परत मागितली. त्याचा राग आल्याने भरत बारी याने गुरूवारी ११ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. यात लोखंडी रॉडने मारहाण केल्याने शिवदास बारी यांचा हात फॅक्चर झाला. या सोबतच सतीष भानुदास बारी यानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शुक्रवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शिवदास बारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाळके करत आहेत.

Protected Content