एरंडोल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची सरशी

एरंडोल प्रतिनिधी-एरंडोल तालुक्यात आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत 37 ग्रामपंचायती पैकी 20 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असा दावा शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांनी केला आहे. या दाव्यामुळे तालुक्यात परत एकदा शिवसेनेने आपली पकड अधिक मजबूत केल्याचे राजकीय गोटातून बोलले जात आहे.

तालुक्यातील 37 ग्रामपंचायती पैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आधी 8 ग्रामपंचायती बिनविरोध होऊन शिवसेनेने आपला भगवा फडकवला आहे. विशेष हे की या निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे त्यात जळू चे विद्यमान सरपंच रवींद्र जाधव फरकांडे चे माजी सरपंच सुरेश बळीराम पाटील, यांना मतदारांनी अव्हेरले आहे. तालुक्यातील कासोदा मोठी ग्रामपंचायत असून आता सरपंच पदाच्या निवडीसाठी या ठिकाणी पॅनल तयार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तर आडगाव येथे माजी आमदार पारूताई वाघ यांचे सुपुत्र डॉक्टर प्रविण वाघ यांच्या परिवर्तन पॅनेलने सर्वाधिक 10 जागा घेऊन मुसंडी मारली आहे. तळई येथे माजी सभापती सुलोचना पाटील या पराभूत झाल्या असून मात्र त्यांचे पती प्रभाकर पाटील हे विजयी झाले आहेत.

उत्राण अ.ह येथे माझी पंचायत समिती सदस्य शारदा भागवत पाटील व दुसरे माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय भागवत पाटील या दोघांच्या पॅनलमध्ये काट्याच्या लढती होऊन शारदा पाटील यांनी बहूमत पटकावले आहे. उत्राण गु. ह विद्यमान उपसभापती अनिल महाजन यांच्या भगिनी विजयी झाल्या आहेत. तसेच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या पक्षांनी काही ग्रामपंचायतींवर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीवर काही जागांवर विजय मिळविला आहे. मात्र काँग्रेस पक्षाची पूर्ण वाताहत झाल्याचे चित्र आहे.

आमदार चिमणराव पाटील यांनी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना 21 लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केल्यामुळे जवळपास 8 ग्रामपंचायतींनी निवडणूक न घेता आमदारांच्या आमदारांच्या आवाहानाला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे भविष्यात ग्रामीण भागात आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे विकास कामाची गंगागावागावात पोहचल्या शिवाय राहणार नाही अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा पंचायत समिती त्यानंतर आता ग्रामपंचायत त्रिसूत्री कार्यक्रम शिवसेनेने राबविल्यामुळे आमदार चिमणराव पाटील यांनी जनमानसामध्ये आपले नेतृत्व सिद्ध केल्याचे राजकीय गोटातून बोलले जात आहे.

दरम्यान सोमवारी सकाळी दहा वाजता इंडोर स्टेडीयम मध्ये सकाळी दहा वाजेच्या सुमारास मतमोजणीस प्रारंभ होऊन दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित करण्यात आले मतमोजणी शांततेत पार पडली. निवडणूक निरिक्षक गोविंद दानेज व अमळनेर विभागाचे डी वाय एस पी राकेश जाधव यांनी मतमोजणी स्थळी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. समाधान व्यक्त केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांनी काम पाहिले. तर त्यांना निवासी नायब तहसीलदार एस पी शिरसाठ नायब तहसीलदार रवींद्र जोशी व सरकारी कर्मचाऱ्यांनीसहकार्य केले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. निकाल ऐकण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनीमतमोजणी केंद्राच्या बाहेर केली होती निकाल जाहीर झाल्यावर उमेदवारांचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करून जल्लोष करीत होते.

Protected Content