कोरोना : जिल्ह्यात आज ४२ बाधित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात नवीन ४२ रूग्ण आढळून आले आहे. आजच ३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच्या आकडेवारीनुसार आठ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-२१, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-३, चोपडा-१, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-१ आणि बोदवड-० असे एकुण ४२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५६ हजार ६५९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५४ हजार ८१२ बरे होवून घरी परतले आहे. तर ५०२ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाने कळविले आहे.

Protected Content