सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भव्य मिरवणूकीत सहभाग नोंदविला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने जळगाव शहरातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. रविवारी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापासून या मिरवणूकीला सुरूवात करण्यात आली. यावेळी मिरवणूकीच्या सुरूवातीला लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने आदीवासी बांधवांनी पारंपारित वेशभुषेत आपली आदिवासी नृत्यकलेचे सादरीकरण केले. ढोल ताशांच्या गजरात लहान थोर व महिलांनी फुगड्या खेळून रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यात काही महिला व पुरूषांनी पारंपरिक पध्दतीने चित्तथरारक मैदानी खेळाचे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. पोतादार इंग्लिश मीडियम स्कू, ए.टी.झांबरे विद्यालय, प.वि.पाटील विद्यालयात, विवेकानं प्रतिष्ठान इंग्लिश स्कूल या सह आदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅलीत पारंपारिक वेशभुषेत नृत्याचे सादरीकरण केले. तर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सजीव आरास दाखविण्यात आला.

Protected Content