ममुराबाद नाक्यावरील सट्ट्याच्या अड्ड्यावर पोलीसांची धाड; चार जणांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ममुराबाद नाक्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या सट्ट्याच्या अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी शुक्रवारी दुपारी छापा टाकला आहे. चार संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय ओंकार गोंदळे रा. प्रजापत नगर, विशाल अशोक पाटील रा. चौघुले प्लॉट, प्रकाश समरथ बाविस्कर रा. भुसावळ व मंगेश मच्छिंद्र सोनवणे वय 30 रा. निमखेडी शिवार, आहुजा नगर या संशयितांसह सट्टा जुगाराचे साहित्य व दुचाकी असा 41 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात  घेण्यात आला आहे.

ममुराबाद रोडवर नाल्याच्या बाजूस एका पत्र्याच्या शेडमध्ये सट्टा खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार चिंथा यांनी शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास रवींद्र मोतीराया अनिल पाटील, किरण धनके,  मनोहर जाधव   ,अशोक फुसे व विनयकुमार देसले यांच्या पथकासह छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम, सट्टा जुगाराचे साहित्य तसेच 27 हजार रुपये किमतीची दुचाकी असा 41 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी कर्मचारी रविंद्र मोतीराया यांच्या फिर्यादीवरुन विशाल पाटील, प्रकाश बाविस्कर, संजय गोंदळे, मंगेश सोनवणे या चार जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वीही गेल्या काही दिवसांपुर्वी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी शनिपेठ परिसरात कारवाई  केली. आता पुन्हा ममुराबाद नाक्यावरील या कारवाईने खळबळ उडाली आहे.

 

Protected Content