विद्यार्थीनींच्या ढोल व लेझीम पथकाने आणली रंगत ! ( व्हिडीओ )

जळगाव- मंगेश बाविसाने | येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिवजयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत मुलींच्या ढोलपथक व लेझिम नृत्याने धमाल आणली.

सकाळी विद्यापीठाच्या मुख्यप्रवेशद्वारापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची ढोल-ताशाच्या गजरात मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रभागी विद्यापीठातील प्रशाळेतील मुलींचे लेझीम पथक त्यामागे घोड्यावर बसलेले मावळे, छत्रपती शिवाजी महाराज व मॉं जिजाऊ व बालशिवाजी यांच्या वेशभुषेत बग्गीत बसलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिंनीने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

महेश चौधरी यांनी शिवाजी महाराजांची तर श्रेया पाटील यांनी मॉ साहेब जिजाऊ यांची वेशभुषा केली होती तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत स्वप्नील नारखेडे, बहिर्जी नाईकांच्या भूमिकेत प्रफुल पाटील हा होता. बाल शिवाजीची वेशभूषेत दोन बालके होती.

शोभायात्रेत सकाळी १० वाजता जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव विनोद पाटील, डॉ.अजय पाटील, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्य मापन मंडळ प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, डॉ.दिनेश पाटील, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु.पगारे उपस्थित होते.

खालील व्हिडीओत पहा विद्यापीठातील शिवजयंतीची मिरवणूक

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/734598644729657

Protected Content