आसोदा, ममुराबाद येथील निवास प्रयोजनासाठीच्या जागेसाठी ग्रामस्थांचे उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा, ममुराबाद येथील निवास प्रयोजनासाठी ५०० चौरसफूट जागा मोजून द्यावी, या मागणीसाठी जी.एस.मैदानासमोरील पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव विनोद अढाळके यांच्या नेतृत्वात सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने सर्वांसाठी घरे २०२३ या धोरणा अंतर्गत जळगाव तालुक्यातील तालुक्यातील आसोदा, ममुराबाद येथील निवास प्रयोजनासाठी जागा मोजून द्यावी या मागणीसाठी आतापर्यंत ४० वेळा निवेदने व ३० वेळा आंदोलन केले आहे. निवासी प्रायोजनासाठी आपल्या वारंवार मागणी केली असता पंचायत समितीच्या वतीने फक्त लेखी आश्वासने देवून पळवाट काढीत आहे. गेल्या २०१८ पासून ते आतापर्यंत वारंवार मागणी करूनसुध्दा शासनस्थरावर कोणतीही कारवाई न करता अन्याय करीत आहे.

याबाबत आसोदा व ममुराबाद ग्रामपंचायतीने पंचायत समिती कार्यालयात सर्व कागदपत्रे दिले आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष जागा वाटपाचा कार्यक्रमाला सुरूवात होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुटणार नाही असा पवित्रा महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन संघटनेने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव विनोद अढाळके यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. यावेळी आसोदा आणि ममुराबाद गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Protected Content