गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रॅटीट्युड मास्टरीवर व्याख्यान

जळगाव प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रॅटीटयुड मास्टरी हया विषायावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. युनीर्व्हसल हयुमन व्हल्यु (णपर्ळींशीीरश्र र्कीारप तरर्श्रीश) या अंतर्गत येणार्‍या ग्रॅटीटयुड (कृतज्ञता) ह्या मुल्यावर हे व्याख्यान झाले, हे व्याख्यान ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. अ‍ॅग्नल टेक्नीकल महाविद्यालय, मुंबईचे प्राचार्य प्रा.मंगेश मोहन यांनी या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.

हया कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना कृतज्ञता आणि सकारात्मक मुल्य जीवनात कसे आत्मसात करावे या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच आयुष्यात मिळालेल्या गोष्टीबद्दल कसे कृतज्ञ असावे आपल्या रोजच्या जीवनात कृतज्ञता कशी अंगीकारावी यावर विस्तृतपणे मांडणी केली. त्यांनी कृतज्ञतेचे सामाजिक व वैज्ञानिक लाभ समजवुन सांगितले. वैज्ञानिक दृष्टीकोनातुन कृतज्ञनेतेचे महत्व पटवून दिले. त्यामध्ये शारिरीक व मानसिक आरोग्यवर त्यांनी भर दिला तसेच आत्मकेंद्री होऊन जगाकडे नव्या आशेने कसे बघावे हे सांगितले.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणुन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे आयोजन टी.एन.पी.अधिकारी डॉ.विजयकुमार वानखेडे यांनी केले होते, तसेच आयोजनासाठी प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ.नितीन भोळे यांचे सहयोग लाभले. डॉ.सरोज भोळे यांनी व्याख्यानात व्याख्यातांशी संवाद साधला. प्रा.संजय चौधरी आणि प्रा.तृषाली शिंपी यांच्यासह इतर कर्मचार्‍यांनी यशस्वीरित्या पार पाडण्यात सहकार्य केले. कार्यक्रमाला १०० च्या वर विद्यार्थ्यांनाची ऑनलाईन उपस्थित होती. विद्यार्थीनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

तसेच कार्यक्रमाला विभाग प्रमुख अ‍ॅकॅडेमिन डीन प्रा.हेमंत इंगळे, इतर सर्व विभाग प्रमुख व संपुर्ण प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रर्दशन प्रा.दिपाली पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वर्ग यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content