दुचाकी घेण्यासाठी विवाहितेचा छळ; चार जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । दुचाकी घेण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणावे यासाठी विवाहितेचा पतीसह सासरच्यामंडळींकडून छळ केला जात होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील माहेरवाशीन तमन्नाबी इमरान शहा (वय-२१) यांचा भुसावळातील पापा नगरातील इमनान शहा इमाम शहा यांच्यासोबत रितीरिवाजानुसार विवाह झाला आहे. पतीला दुचाकी घ्यावयाची असल्याने माहेरुन विवाहितेने ५० हजार रुपये आणावे, यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. त्रास सहन न झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी निघून आल्या. विवाहितेने गुरुवारी २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पोलिसात धाव घेत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन पती इमनान शहा इमाम शहा, सासरे इमाम शहा, सासू जरीनाबी इमाम शहा, नणंद सुलतानाबी इमाम शहा सर्व रा. पापानगर भुसावळ यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नितीन पाटील हे करीत आहे.

 

Protected Content