Home क्राईम धक्कादायक : अश्लिल चाळे करत चिमुकलीचा विनयभंग

धक्कादायक : अश्लिल चाळे करत चिमुकलीचा विनयभंग

0
109


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मंगळवार २१ जून रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ७ वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्याला आहे. मंगळवारी २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी दामोदर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) याने पीडित मुलीला किराणा दुकानावर बोलून तिचा लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत अश्लिल चाळे केले. दरम्यान हा प्रकार पीडित मुलीने घराच्यांना सांगितला. मुलीच्या आईसह नातेवाईकांनी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दामोदर पाटील यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

 


Protected Content

Play sound