Home क्राईम मेहुणबारे येथील मुलाचे अपहरण

मेहुणबारे येथील मुलाचे अपहरण

0
76


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मेहुणबारे येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहुणबारे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुणाल शांताराम जगताप वय-१६ रा. मेहुणबारे ता.चाळीसगाव मुलगा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता चाळीसगाव शहरातील पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात परीक्षेसाठी जातो असे सांगून घरातून गेला होता. अद्यापपर्यंत हा मुलगा घरी परत येणार नाही, दरम्यान नातेवाईकांनी त्याचा परिसरात सर्वत्र, नातेवाईकांकडे, मित्रमंडळींकडे शोधाशोध केली. तो कुठेही आढळला नाही. दरम्यान कुणालचे वडील शांताराम अशोक जगताप यांनी तीन महिन्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार जालमसिंग पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound