कुख्यात गुंड एजाजला पाटण्यातून अटक; मुंबई पोलिसांचे यश

arrest gangster Ejaz Lakdawala

मुंबई प्रतिनिधी । कुख्यात गुंड एजाज लकडावाला याला बेड्या ठोकण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. बिहारच्या पाटण्यामध्ये त्याला विमानतळावरून अटक करण्यात आली. लकडावालाविरोधात खंडणीचे तब्बल २५ गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी एजाज लकडावाला याला अटक करण्यात आल्याची माहिती गुरुवारी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. एजाज लकडावाला या गँगस्टरविरोधात मुंबईत २५ तर राज्यभरातही अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. एजाज लकडावाला परदेशात राहून भारतात खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत होता. देशातील काही मोठ्या लोकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचे काम त्याच्या टोळीकडून केले जात होते. तो पाटण्यामध्ये येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यावर कारवाई करीत त्याला विमानतळावरूनच अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लकडावाला याची मुलगी सानिया हिला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने (दि.३०) डिसेंबर रोजी बनावट पासपोर्टप्रकरणी अटक केली होती. ती मुंबईहून नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती.

Protected Content