जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला दारूच्या नशेत मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चित्रा चौकात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला दारूच्या नशेत शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली. याबाबत शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, तौशीफ शेख फिरोज (वय-२४) रा. शिवाजीनगर जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहरातील चित्रा चौकात आलेला होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून अक्षय संजय अकोलकर रा.शिवाजीनगर यांनी दारूच्या नशेत तहसील याला शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत  जखमी केले. या घटनेबाबत तहसील शेख फिरोज याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मारहाण करणारा अक्षय संजय अकोलकर यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अलका वानखेडे करत आहे.

Protected Content