गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने “स्पार्क आणि तेजस्वीता-२०२३”चा सांस्कृतीक महोत्सव उत्साहात साजरा

 

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  । गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन SPARK 2K23 (The Burning Desire) व डॉ वर्षा पाटील वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन महाविद्यालयात TEJASWITA 2023 (Fly in the Sky) या दोनही सांस्कृतीक महोत्साव उत्साहात साजरा झाला.

 

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. 09 फेब्रुवारी रोजी दोन्ही महाविद्यालयात स्पोर्ट्स घेतले गेले. यामध्ये बॉक्स क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम इ. खेळ खेळले गेले. 13 फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात Personality Contest घेतली गेली. या स्पर्धेत कंपनी लोगो ओळखणे, कंपनीच्या tag line ओळखणे, judges round इ. Rounds चा समावेश होता. दुसऱ्या सत्रात ताक धीना धीन  तर तिसऱ्या सत्रामध्ये कोन बनेगा करोडपती हे कार्यक्रम घेतले गेले. 14 फेब्रुवारी रोजी प्रोफेशनल डे साजरा केला. या दिवशी राष्ट्रीय स्तरीय एक दिवसीय चक्रव्यूह स्पर्धा घेतली गेली या स्पर्धेमध्ये आठ महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 15 फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात food bonanzaa हा कार्यक्रम घेतला गेला व दुसऱ्या सत्रामध्ये सामाजिक बांधिलकी अंतर्गत सायबर सीक्युरिटी या विषयावर रॅली घेतली गेली. ऑनलाइन फ्रॉड विषयावर जनजागृती  केली गेली. यावेळी गोलाणी मार्केट, स्टेशन रोड, महात्मा फुले मार्केटमध्ये जनजागृती साठी पत्रके वाटली गेली. 16 फेब्रुवारी रोजी Treasure Hunt घेतली गेली. या स्पर्धेत 4 teams केल्या होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी clue लावून खजिना विद्यार्थ्यांना शोधायचा होता.

 

17 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले गेले. यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ वर्षा पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून जैन इरीगेशन मधील श्री सी.एस.नाईक, आय एम एस साकेगावचे डॉ.प्रशांत बोरनारे, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके, डॉ. वर्षा पाटील वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रशांत वारके यांनी केले.  डॉ. वर्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. श्री. सी एस नाईक यांनी स्किल विकसित करण्यावर भर द्या असे सांगितले. डॉ प्रशांत बोरनारे  यांनी संभाषण कौशल्यावर जास्त भर देण्यास सांगितले. डॉ वर्षा पाटील वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ निलिमा वारके यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की ऍक्टिव्हिटीएस मध्ये जास्तीत जास्त भाग घ्या जेणेकरून अंतर्गत कलागुणांचा विकास होतो. यावेळी विद्यार्थ्यांनी सोलो डान्स, ग्रुप डान्स, सिंगिंग, नाटक सादर केले.

 

या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व स्पर्धेमध्ये जींकलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले गेले.  ह्या स्नेहसमेलनात MBA च्या प्रथम ,द्वितीय वर्षातील तसेच BBA, BCA च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्नेहसंमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. वैजयंती असोदेकर व प्रा. मिताली शिंदे यांनी काम बघीतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनम शेख, शिवानी मूथा, उन्नती तांबे, सानिया शेख यांनी केले. आभारप्रदर्शन हेमांगी पाटील या विद्यार्थिनीने केले.

Protected Content