सिंधी कॉलनी परिसरात अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एका अनेाळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात एका रस्त्याच्या बाजूला बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास येथील रहिवाशी अशोक मंधान यांना अनोळखी (वय अंदाजे ४५ वर्षे ) एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला. यासंदर्भात त्यांनी परिसरात सर्वत्र माहिती घेतली असता ओळख पटली नाही. यानंतर मंधान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी मयत घोषीत केले. याबबात डॉ. सचिन अहिरे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

Protected Content