Home क्राईम फरार कैद्याला जळगावातून अटक

फरार कैद्याला जळगावातून अटक

0
39


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोरोना काळात अभिवचन रजेवर कारागृहातून बाहेर पडून पुन्हा कारागृहात दाखल न होता फरार झालेल्या जळगाव शहरातील खेडी परिसरातील इंदिरा नगर येथील रहिवासी कैद्याविरुद्ध बुधवार १२ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

राजू हिरालाल मिश्रा असे फरार कैद्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खेडी परिसरातील इंदिरानगर येथील राजू मिश्रा हा एका गुन्ह्यात पैठण येथील कारागृहात दाखल आहे . ६ ऑगस्ट २०२१ रोजी कोरोना काळात आकस्मिक अभिवचन रजेवर राजू मिश्रा यास सोडण्यात आले होते . मात्र मुदत संपूनही तो पुन्हा कारागृहात परतला नाही. फरार झाला. याबाबत बुधवार 12 ऑक्टोबर रोजी पैठण कारागृहाचे शिपाई साहेबराव लक्ष्मण फुसे वय ५५ यांनी दिलेला तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात राजू मिश्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार हे करीत आहेत.


Protected Content

Play sound