नेपाळ पोखरामध्ये भारतीय कबड्डी संघाने पटकावले ‘सुवर्णपदक’

nepad

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । नेपाळ पोखरा येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान फस्ट इंडो नेपाळ स्पोर्ट अँड गेम्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप अॅमेचर स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारतीय संघाच्या कबड्डी खेळाडूंनी चांगली कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

यामध्ये १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील मुलांच्या गटाने पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून मुक्ताईनगर येथील सुमेरसिंग राजपूत (कर्णधार), मयूर राणे (उपकर्णधार), अमेय देसाई, प्रथमेश आढाव, विवेक नेवाळे, नागेश सूर्यवंशी, अनिकेत कोचरेकर, मधुकर बिडवे, राजेश सावंत, चेतन भोईर, राकेश डोंगरे, विशाल जमदाळे, लोकेश खैरनार या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. ही स्पर्धा जिंकण्यासाठी महाराष्ट्राचे सचिव संजय निकम, बोदवड तसेच प्रशिक्षक अजय जाधव, सिंधुदुर्ग यांचा मोलाचा वाटा होता.

विशेषत: यामध्ये जळगाव जिल्ह्यातील कबड्डी पटूंनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंनी आपले वर्चस्व राखत संघाला सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कर्णधार मुक्ताईनगर येथील खेळाडू सुमेरसिंग राजपूत आणि धुळे येथील खेळाडू लोकेश खैरनार यांनी खेळलेल्या यशस्वी चालींनी प्रतिस्पर्धी संघाला कुठल्याही बाबतीत वरचढ होण्यास दिले नाही. खुला गटातून कर्णधार सुमेरसिंग राजपूत यानी चांगला खेळ करत नेपाळमध्ये भारतीय तिरंगा अभिमानाने फडकवत यश संपादन केले. खरोखरच योग्य मार्गदर्शन आणि प्रामाणिक मेहनत केल्यावर माणूस सातासमुद्रापलिकडे जाऊन आपले वलय निर्माण करू शकतो हे या मुक्ताईनगरच्या सुपुत्राने आज दाखवून दिले. या संघाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

Protected Content