राजीव गांधी हत्याकांड : सुप्रीम कोर्टाचे आदेशानुसार एका आरोपीची सुटका

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील शिक्षा भोगत असलेल्या दोषीपैकी एका आरोपीची सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी एका सभेदरम्यान तामीळनाडूतील श्रीपेराम्बदूर येथे हत्या करण्यात आली होती. या घटनेत राजीव गांधी हत्याप्रकरणी नलिनी श्रीहरन, मरूगन, यांच्यासह अन्य ७ दोषींना न्यायालायाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१४ मध्ये न्यायालयाकडून हि शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. यातील पेरारीविलन गेल्या ३१ वर्षापासून तुरुंगात असून या दोषीची शिक्षा पूर्ण झाल्यामुळे न्यायालायाने पेरारीविलन याला सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Protected Content