मोहंमद शमीच्या हॅटट्रिकने भारताचा विजय

mohammad shami

साऊदम्पटन वृत्तसंस्था । विश्‍वचषकातील अफगाणिस्तान विरूध्दच्या सामन्या मोहंमद शमी याने निर्णायक षटकात घेतलेल्या हॅटट्रिकमुळे भारताला निसटता विजय मिळवता आला.

विश्‍वचषकात आजवर दणकेबाज कामगिरी करणार्‍या टिम इंडियाला अफगाणिस्तानविरूध्द सहज विजय मिळवेल असे वाटत होते. तथापि, असे न होत अफगाण संघाने अतिशय चिवट झुंज देऊन भारताला जेरीस आणले. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय अफगाणी गोलंदाजांनी चुकीचा ठरविला. विरोधी संघाने पहिल्यापासूनच भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले. पाचव्या षटकात मुजीब उर रहमानने रोहित शर्माला त्रिफळाचीत केले. यानंतर मोहम्मद नबीने लोकेश राहुलला बाद केले. लोकेश राहुलने ५३ चेंडूंत २ चौकारांसह ३० धावा केल्या. यानंतर विजय शंकर व कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र विजय २९ धावांवर बाद झाला. कोहलीदेखील ६७ धावांवर बाद झाला. धोनी-केदार जाधव ही जोडी टिकली तरी त्यांना गतीने धावा बनवत्या आला नाही. धोनीने ५२ चेंडूंत २८ धावा केल्या. तर केदार जाधवने ६८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या.

दरम्यान, २२५ धावांचा पाठलाग करताना मोहम्मद नबीचं अर्धशतक व रहमत शहाच्या ३६ धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने भारताच्या नाकी नऊ आणले. शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी १६ धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर नबीने चौकार मारला. मात्र तिसर्‍या चेंडूवर नबी झेलबाद झाला. त्यापुढच्या दोन्ही चेंडूंवर यॉर्कर टाकून फलंदाजांना त्रिफळाचीत करत शमीने संघाला विजय मिळवून दिला.

Protected Content