पारोळा येथे क्रीडा दिनानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त  राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ५८  मुली व ८० मुलांनी सहभाग घेतला होता.

 

क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , विद्यार्थी विकास विभाग, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय क्रीडा विभाग, यांच्या संयुक्त विद्यमानाने मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त  मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  या मॅरेथॉन स्पर्धेच्या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक  पराग मोरे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय भावसार, सिनेट सदस्य डॉ. अजय पाटील, जळगाव जिल्हा रा.से.यो डॉ. मनीष करेंजे, रा से यो प्रमुख डॉ. संभाजी सावंत ,विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. एस.एन. साळुंखे, वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. सी. आर. पाटील, विजय पाटील,   नेरपगार सर आदी उपस्थित होते. मुलांच्या मॅरेथॉन स्पर्धेचे सुरुवात पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तर मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात  पराग मोरे यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक रोशन खताळ, द्वितीय क्रमांक गणेश पाटील, तृतीय क्रमांक गौरव पाटील यांनी पटकावले. मुलींमध्ये प्रथम क्रमांक चेतना पाटील, द्वितीय क्रमांक भाग्यश्री पाटील , तृतीय क्रमांक दर्शना चौधरी यांनी मिळवला.  बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश के. के. माने उपस्थित होते त्यांच्या हस्ते विजय खेळाडूंना रोख रक्कम, ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आले.  या सर्व विजेत्या खेळाडूंची माजी खासदार वसंतराव मोरे, प्रशासकीय अधिकारी रोहन मोरे यांनी अभिनंदन केले. सूत्रसंचालन प्रा. जे. बी. पाटील तर आभार विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. एस. एन. साळुंखे यांनी मानले. यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू, भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व खेळाडू यांनी कामकाज पाहिले.

Protected Content