ब्रिटनमधून येणार्‍या विमानांना बंदी

 

नवी दिल्ली । ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक विषाणून आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने तेथून येणारी हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून येताच युरोपातील अनेक देशांनी ब्रिटनहून येणारी विमानं रोखण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर देशातील काही मुख्यमंत्री आणि नेत्यांनी ब्रिटनहून येणारी विमानं रोखा, असं आवाहन केंद्राला केलं होतं. त्यानंतर आता केंद्र सरकारनं विमानं सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून ही हवाई सेवा रोखली जाईल. त्यापूर्वी भारतात येणार्‍या लोकांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल.

या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल.

Protected Content