जळगावात युवासेनेतर्फे २५०० लोकांना खिचडी व शिरा वाटप

 

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या आज (२२ नोव्हेंबर) ७८व्या वाढदिवसानिमित्त युवासेने तर्फे जळगाव शहरातील दाणा बाजार, रेल्वे स्थानक, शिवाजी नगर, रेल्वे माल धक्का, सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी एकाच वेळी सुमारे २५०० गरजू लोकांना खिचडी व शिरा वाटप करण्यात आला.

यावेळी महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लद्धा, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेना सहसचिव विराज कावडीया, विस्तारक किशोर भोसले, जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, शोभा चौधरी, ज्योती शिवदे, सरिता माळी, मनीषा पाटील, निळू इंगळे, युवासेना महानगर युवाअधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, पियुष गांधी, सागर हिवराळे, अमोल मोरे, संकेत कापसे, अंकित कासार, तेजस दुसाने, चेतन कापसे, शंतनू नारखेडे, सचिन चौधरी, विजय लाड, अमित जगताप, प्रीतम शिंदे, भूषण सोनवणे, प्रशांत वाणी, राहुल ठाकूर, आदी युवासैनिक उपस्थित होते.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!